loader
Breaking News
Breaking News
Foto

आजगाव विद्याविहार माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेचे छप्पर दुरुस्त

आजगाव - येथील विद्या विहार इंग्लिश स्कूल प्रशालेच्या छप्पराचा काही भाग मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत छप्पराची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीचे काम करून दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

माजी विद्यार्थी वासुदेव सावंत, प्रभाकर (पबी) कळसुलकर, भाऊ रेवाडकर, बाळकृष्ण हळदणकर (सहसचिव, माजी विद्यार्थी संघ), दत्तप्रसाद प्रभू (सदस्य, शाळा समिती), शशिकांत मुळीक (प्रशालेचे माजी कर्मचारी) व संकेत गावडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत छप्पर दुरुस्तीचे काम पूर्ण करून दिले. प्रशालेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे काम कोणतीही अपेक्षा न ठेवता करण्यात आले. तसेच ‘आम्ही वर्ग मित्र’ ग्रुपचे सदस्य दिनानाथ काळोजी यांनी शाळेच्या परिसरात वाढलेली झाडी - चारा कटरच्या साहाय्याने साफ करून दिली.

टाईम्स स्पेशल

माजी विद्यार्थी, माजी विद्यार्थी संघ व शाळा समितीकडून प्रशालेच्या विकासासाठी मिळणारे सहकार्य निश्चितच प्रेरणादायी आहे. आजी-माजी विद्यार्थ्यांकडून सामाजिक बांधिलकीतून ‘माझी शाळा – माझी जबाबदारी’ ही भावना अधिक दृढ होत असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी सांगितले. प्रशालेला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg