वैभववाडी (प्रतिनिधी) - तिथवली भटवाडी येथे तुटून पडलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून बाजीराव भगवान सावंत या शेतकर्याची म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. त्यामुळे सुमारे १ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी झाला असून वीज वितरणच्या हलगर्जीतपणामुळे संतप्त तिथवली ग्रामस्थानी संबधीत उपअभियंता व वायरमन यांना ग्रामपंचायत कार्यालयात घेराव घातला. याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांना माहिती मिळताच त्यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता भांबरे यांच्याशी संपर्क साधून भांबरे यांना घटनास्थळी येऊन संबंधित शेतकर्याला नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव तयार करून नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.
बाजीराव सावंत यांनी नेहमीप्रमाणे आपल्या म्हैसी चारण्यासाठी माळरानावर सोडल्या होत्या. अगोदरच माळरानावर तुटून पडलेल्या विज वाहिनीचा म्हैशीला शॉक लागल्यामुळे म्हैस जागी कोसळली. म्हैशीला वाचवण्यासाठी बाजीराव सावंत पुढे जात होते मात्र तत्पूर्वी बाजूला असलेल्या कामगारांना वीज वाहिनी तुटून पडल्याचे लक्षात आल्याने त्यांनी त्यांना म्हैसी जवळ जाण्यापासून रोखले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
याबाबत वायरमन यांना माहिती देण्यात आली त्यांनी लागलीच वीजपुरवठा खंडित केला. तुटून पडलेल्या वीज वाहिनीला स्पर्श होऊन म्हैस गतप्राण झाल्याची माहिती गावात समजताच गावातील सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र झाले त्यांनी वीज वितरणचे भुईबावडा येथील शाखा अभियंता नेरले व संबंधित वायरमन यांना बोलावून घेतले. वीज वितरणाच्या गलथान कारभारामुळेच गरीब शेतकर्याच्या म्हैशीचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.







































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.