मुंबई: थकीत बिलांचे पैसे न मिळाल्यामुळे नवी मुंबईतील एका ३७ वर्षीय सरकारी कंत्राटदाराने आपल्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने 'पीटीआय' या वृत्तसंस्थेने बुधवारी ही माहिती दिली.
पीटीआयच्या वृत्तानुसार, गजानन देवकते असे ओळख पटलेल्या या व्यक्तीने मंगळवारी संध्याकाळी उळवे येथील 'शगुन पॅराडाइज' इमारतीतील आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.या घटनेनंतर, महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर मराठी कंत्राटदारांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर ढकलल्याचा आरोप केला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
या बाबत आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केली आहे , त्यामध्ये मराठी ठेकेदारांना आवाहन केले आहे . " वर्षानुवर्षे थकीत असलेली कोट्यवधी रुपयांची बिलं मिळत नसल्याने राज्यातील मराठी कंत्राटदारांवर या सरकारने आत्महत्येची वेळ आणलीय. आतापर्यंत ६ कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या असून आज नवी मुंबईतील कंत्राटदार गजानन देवकाते यांनीही आपलं आयुष्य संपवलं. गुजरात आणि आंध्र प्रदेशातील ठेकेदारांची कोट्यवधी रुपयांची बिलं तातडीने अदा केली जातात मग मराठी कंत्राटदारांनी सरकारचं काय घोडं मारलंय? कितीही आंदोलनं केली, संविधानिक मार्गाने मागणी केली तरी सरकार कंत्राटदारांची बिलं देत नाही. त्यामुळं आत्महत्या करण्यास भाग पाडलं म्हणून या सरकारवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करु नये?माझी सर्व मराठी कंत्राटदारांना विनंती आहे की, आत्महत्या हा आपला मार्ग नाही. आपल्याला आपल्या हक्कांसाठी, कुटुंबासाठी आणि अस्तित्त्वासाठी एकत्रित येऊन मोठा लढा उभारावा लागेल. संघर्षाच्या मार्गाने या सरकारला आपण वठणीवर आणू, पण कृपया कुणीही आत्महत्या करु नये. गजानन देवकाते यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. "







































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.