loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय पदे तातडीने भरण्यात यावीत, पालकमंत्री राणे यांच्याकडे देवानंद पालांडे यांची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) - तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात विविध महत्त्वाची वैद्यकीय पदे रिक्त असून, त्यामुळे रूग्णसेवेवर परिणाम होत आहे. ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य देवानंद पालांडे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली आहे. याबाबत पालांडे यांनी मंत्री राणे यांना निवेदन दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या निवेदनात, तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ १, बालरोगतज्ज्ञ १ आणि भुलतज्ज्ञ १ अशी एकूण तीन पदे रिक्त असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हे रूग्णालय महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने रूग्णांना उपचारासाठी कणकवली, ओरोस तसेच कोल्हापूर येथे जावे लागत आहे.

टाईम्स स्पेशल

त्यामुळे या रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या करून तालुक्यातील रूग्णांना स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालांडे यांनी केली आहे. पालकमंत्री राणे यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg