loader
Breaking News
Breaking News
Foto

देव्हारे वडवली आतले मार्गावर बिबट्याचा संचार

मंडणगड (प्रतिनिधी) : देव्हारे वडवली आतले शेवरे मार्गावर बिबट्याचा वावर वाढला आहे. रात्री तसेच दिवसा ढवळ्या देखील बिबटयाचे लोकांना दर्शन होत असल्याने रानात गुरे चारण्यासाठी तसेच शेती आणि फळ बागांमध्ये कामाला जाण्यासाठी शेतकऱ्यांना भिती वाटत आहे. त्यामुळे संचार वाढलेल्या बिबटयाला वन विभागाने पिंजरा लावून पकडावे आणि येथून दूर कुठेतरी अभयारण्यात सोडण्यात यावे म्हणजे लोकांच्या मनातील भिती दुर होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड तालुक्यातील देव्हारे वडवली आतले शेवरे चिंचघरकडे जाणारा सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असा मार्ग आहे. याच मार्गावरुन आतले तोंडली मार्गे पालवणी तसेच दापोलीकडे जाणारा मार्ग आहे. अशा या मार्गावरील वडवली, आतले या महत्त्वाच्या गावातील रहीवाशांना बाजारहाट करण्यासाठी देव्हारे येथे चालत यावे लागते तसे विद्यार्थ्यांनाही शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी देव्हारे पर्यंत चालतच ये जा करावी लागते. त्यामुळे हा मार्ग सकाळपासूनच अगदी रात्रौपर्यत रहदारी असलेला असा एक महत्वाचा रस्ता आहे. अशा या रस्त्यावर गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रीच्या वेळेस चक्क बिबट्या बिनधास्तपणे वावर करताना अनेकांनी अनेकदा पाहिले आहे. वावरणाऱ्या बिबटयाचे प्रतिबिंब काहींनी तर आपल्या मोबाईलमध्ये टीपले आहे. त्यामुळे त्याला बिबट्याच्या वावर असलेल्या पुष्टी मिळाली आहे. त्यामुळे अजून अधिक लोक भयभीत झाले आहेत.

टाईम्स स्पेशल

गेल्या पंधरा दिवसांपासून बिबटयाचा येथे वावर असला तरी अजूनही पाळीव प्राणी तसेच मनुष्य हानी करण्याचा येथे प्रकार घडलेला नसला तरी अनेकांच्या प्रत्यक्ष दृष्टीस बिबट्या पडल्याने येथील शेतकऱ्यांना आपल्या रानात कामासाठी जाण्यास तसेच फळ बागायतदार आणि विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात जाण्यासाठी भिती वाटत आहे. त्यामुळे मनुष्यप्राणी अथवा पाळीव प्राण्यांची हानी होण्याआधीच वावर वाढलेल्या बिबटयाला पिंजरा लावून वन विभागाने पकडून येथील लोकांच्या मनात घर करून बसलेली भिती दूर करावे अशी मागणी येथील रहीवाशांकडून केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg