loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकिसरे गावठणवाडी येथील करूणा वळंजूचे उपचारादरम्यान आकस्मिक निधन

वैभववाडी (प्रतिनिधी) - कोकिसरे गावठणवाडी येथील बारावीत शिकणार्‍या करूणा प्रकाश वळंजू वय १७ हिचे उपचारादरम्यान ओरोस येथे आकस्मित निधन झाले आहे. करूणा वळंजु ही वैभववाडी येथील हेमंत केशव रावराणे विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होती. गेले दोन दिवस ती सर्दी तापामुळे आजारी होती. तिच्यावर वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी तिला ओरोस जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र तिची प्रकृती अधिकच नाजूक झाल्याने तिला बांबोळी गोवा येथे घेऊन जाण्यास नातेवाईकांना सांगण्यात आले. मात्र पुढे नेण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. करुणाच्या अचानक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तिच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ, काका, काकी असा परिवार आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg