loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकर्‍यांना अद्याप नुकसान भरपाई मिळेना आणि सरसकट कर्ज माफीचाही भुलभुलय्या कळेना

देवळे (प्रकाश चाळके) - शासनाने कोकणातील शेतकर्‍यांना हेक्टरी २२,५०० रुपयांची आंबा काजूची नुकसान भरपाई जाहीर केली असून ते गावातून नुकसान भरपाईची यादी जाहीर झाली आहे. त्याप्रमाणे बहुसंख्य शेतकर्‍यांनी केवायसी ही केली आहे. मात्र महिना उलटून गेला असून अद्याप त्या शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होत नसल्याने जगाचा पोशिंदा शेतकरी आजही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. शासनाच्या या नुकसान भरपाईसाठी शेतकरीवर्ग दोन-चार दिवसांनी आपल्या बँक खात्याची रक्कम जमा झाल्याबाबत चौकशी करत असतो. मात्र बँकेत गेल्यानंतर त्याची निराशाच होते कारण त्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम सर्व कागदपत्र पूर्ण केल्यावर ही जमा नसल्याने हाताश होऊन परत येतो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शासनकर्त्यांनी नुकसान भरपाईची रक्कम कागदपत्र पूर्ण असलेल्या शेतकर्‍यांना त्वरित द्यावी, अशी मागणी होत आहे. सरसकट कर्ज माफ या शासनाच्या घोषणेने आज शेतकरी गोंधळात सापडला आहे कारण दोन लाखापर्यंतची कर्ज सरसकट माफ करणार ही शासनकर्त्यांची घोषणा आज शेतकर्‍यांना खुश करून गेली मात्र सर्वच बँक अधिकारी याबाबत, असे सांगत असतात की ज्या शेतकर्‍यांची दोन लाख पर्यंत कर्ज थकीत आहेत अशांचीच कर्ज माफ होणार असून नियमित कर्ज भरणार्‍यांची कर्ज माफी नसून त्यांना सानुग्रह ५० हजार रुपयांची शासनाकडून मदत करण्यात येणार असून ती सध्या मिळणार नसून काही महिन्यानंतरच जमा होईल, असे सांगण्यात येते.

टाईम्स स्पेशल

मात्र थकवणार्‍या कर्जदारांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली जाणार असल्याचे सांगितले जाते. याबाबत शेतकरीवर्गात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून सरसकट दोन लाख कर्ज माफ केली जाणार या वाक्याचा अर्थ अद्याप पर्यंत शेतकरी वर्गाला कळला नसून आजही नियमित कर्ज भरणारे शेतकरी आपली दोन लाखापर्यंत कर्ज सरसकट माफ होणार या आशेवर असून शासनकर्त्यांनी याचा संबंधित घोषणेचा खुलासा करावा व आशेवर असणार्‍या शेतकर्‍यांना निराश न करता त्यांनाही सरसकट दोन लाखाची कर्ज माफ करावी, अशी मागणी जगाचा पोशिंदा असणार्‍या शेतकरी वर्गाची आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना आंबा काजूची नुकसान भरपाई मिळणार आहे व ज्यांची कागदपत्र पूर्ण आहेत, अशा शेतकर्‍यांना गणपती सणापूर्वी तरी त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg