loader
Breaking News
Breaking News
Foto

दांडेली वाडीसाठी महिनाभरात नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर

बांदा (प्रतिनिधी) - आरोस-दांडेली गावातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच कमी-अधिक दाबाच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. दांडेली वाडीसाठी नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला असून, यासाठी माजी सरपंच कृष्णा पालेकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप माणगावकर आणि पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. दांडेली वाडीतील विजेची समस्या सोडविण्यासाठी माजी सरपंच दादा पालयेकर, संदीप माणगावकर यांनी वीज वितरणकडे नवीन ट्रान्सफॉर्मरची मागणी होती. तसेच पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांचेही लक्ष वेधले होते. धाऊसकर यांनी याची दखल घेतल्याने अवघ्या एका महिन्यात ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान, वीज वितरण कंपनीचे अधिकारी ठाकूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी योग्य जागेची निश्चिती करण्यात आली. यावेळी शरद धाऊसकर यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी कृष्णा(दादा) पालयेकर, बाळा मोरजकर, दुर्गेश मोरजकर, सिद्धेश आरमारकर, ओंकार नाईक, हनुमंत पटेकर, गौरेश पाटकर, संदीप माणगावकर, सागर धाऊसकर आणि न्हावेलीचे माजी उपसरपंच विठोबा गावडे आदी उपस्थित होते. नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर झाल्याने दांडेली वाडीतील विजेची समस्या दूर होण्यास मदत होणार असून, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg