loader
Breaking News
Breaking News
Foto

हद्दपारीचा आदेश मोडून रत्नागिरी फिरणारा संशयित जाळ्यात

रत्नागिरी, : चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला एक संशयित आरोपी आदेशाचे उल्लंघन करून रत्नागिरी शहरात वावरत असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी अत्यंत सतर्कता दाखवत या संशयिताला शहराच्या मध्यवर्ती भागातील आठवडा बाजार परिसरातून पुन्हा ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी त्याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अमिर नजिर मुजावर (वय ४०, रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) असे आदेश मोडून शहरात प्रवेश करणार्‍या हद्दपार संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिस हवालदार दिपराज पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित मुजावर याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे रत्नागिरीच्या उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी त्याला महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६(१)(अ) अन्वये १४ डिसेंबर २०२५ ला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार केले होते.

टाईम्स स्पेशल

कायद्यानुसार या काळात त्याला संबंधित जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास सक्त मनाई होती. मात्र, सरकारी आदेशांची पायमल्ली करत संशयित आरोपी सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतील आठवडा बाजार परिसरात फिरताना पोलिसांना मिळून आला. आदेशाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम १४१ आणि १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg