संगमेश्वर (सत्यवान विचारे) - नोकरी मिळेल या प्रतीक्षेत न राहता स्वतःच्या कौशल्याला व्यवसायाची जोड देत गोळवली येथील तरुण अनिकेत किंजळकर याने स्वावलंबनाची नवी वाट निवडली आहे. द्रोण-पत्रावळी तयार करण्याचा व्यवसाय सुरू करून त्याने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा आदर्श निर्माण केला आहे. आज रोजगाराच्या शोधात अनेक तरुण शहरांकडे धाव घेताना दिसतात. मात्र अनिकेतने आपल्या गावातच उपलब्ध असलेल्या संधीचा शोध घेतला. ‘नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपणच रोजगार निर्माण करायचा’ या विचारातून त्याने द्रोण-पत्रावळी तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसायाची सुरुवात करताना आवश्यक साधनसामग्री, उत्पादनाची गुणवत्ता, बाजारपेठ आणि ग्राहक मिळविणे अशी अनेक आव्हाने त्याच्यासमोर होती. मात्र या अडचणींना न घाबरता त्याने सातत्याने काम सुरू ठेवले. कामातील बारकावे आत्मसात करत उत्पादनाची गुणवत्ता सुधारली आणि हळूहळू ग्राहकांचा विश्वास संपादन केला.
आज धार्मिक कार्यक्रम, सण-समारंभ, लग्नकार्य तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांसाठी द्रोण-पत्रावळी उपलब्ध करून देण्याचे काम अनिकेत करत आहे. पारंपरिक व्यवसायाला आधुनिक बाजारपेठेची जोड देत त्याने आपल्या उद्योगाला आकार दिला आहे. द्रोण-पत्रावळीला ग्रामीण संस्कृती आणि परंपरेत विशेष महत्त्व आहे. प्लास्टिक व थर्माकोलच्या वापराला पर्यावरणपूरक पर्याय म्हणून पत्रावळींची मागणी वाढत असताना अनिकेतने या संधीचा योग्य उपयोग केला आहे. काम कोणतेही असो, त्यामध्ये प्रामाणिकपणा आणि कष्ट असतील तर त्यातून निश्चितच प्रगती साधता येते, हे त्याच्या वाटचालीतून दिसून येते. स्वतःच्या हाताने काम करण्याची तयारी आणि व्यवसाय उभारण्याची जिद्द यामुळे तो कुटुंबाला हातभार लावत असून स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ सरकारी अथवा खासगी नोकरीच्या प्रतीक्षेत न राहता आपल्या परिसरातील गरजा, उपलब्ध साधने आणि स्वतःच्या कौशल्यांचा विचार करून छोट्या उद्योगांची सुरुवात करावी, असा संदेश अनिकेतच्या प्रवासातून मिळतो. गोळवलीच्या मातीतून द्रोण-पत्रावळीच्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबनाची वाट निर्माण करणारा अनिकेत किंजळकर हा ‘नोकरीच्या शोधात भटकणारा नव्हे, तर स्वतः रोजगार निर्माण करणारा तरुण’ म्हणून प्रेरणादायी ठरत आहे.







































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.