loader
Breaking News
Breaking News
Foto

शेतकरी कर्जमाफीची यादी प्रसिद्ध झाली पण अजून ग्रामीण भागात अंमल नाही

रत्नागिरी (वार्ताहर) - महाराष्ट्र शासनाने शेतकरी कर्जमाफी घोषणा करुन कर्जदार शेतकर्‍यांची यादी ग्रामीण पातळीवर प्रसिद्धही करण्यात आली मात्र प्रत्यक्षात अजून शेतकर्‍यांची कर्जमाफी झालेली दिसून येत नाही. कर्जमाफी केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कृषी खात्यामार्फत कर्जदार शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत अहवाल एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र अजून रत्नागिरी जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे कोठे अडले आहे? शेतकर्‍यांना दिलासा देणारा निर्णय असताना प्रशासकीय पातळीवर या योजनेला अटकाव निर्माण केला जात आहे का? जेणेकरुन शासनाची प्रतिमा शेतकर्‍यांसमोर खराब होईल, असा प्रयत्न तर नाही ना? त्यामुळे लवकरात लवकर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याचे प्रयत्न सुरु व्हावेत आणि शेतकर्‍यांना लवकरात लवकर कर्जमुक्त करावे, जेणेकरुन पुढील हंगामासाठी शेतकर्‍यांना बँका कर्ज देवू शकतात.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg