loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लब ऑफ मालवण व डोंबिवली तर्फे २९० विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ ॲपचे वितरण

मालवण (प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ मालवण आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुक्यातील विविध शाळांमधील इयत्ता दहावीच्या २९० विद्यार्थ्यांना ‘स्टडी बडी’ शैक्षणिक ॲपचे वितरण भंडारी ए. सो. हायस्कूल, मालवण येथे करण्यात आले. या कार्यक्रमास रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे पदाधिकारी, रोटरी क्लब मालवणच्या अध्यक्ष नीलम जोशी, सचिव प्रविणा शिंदे, खजिनदार प्रदीप सामंत, इव्हेंट को-ऑर्डिनेटर डॉ. लीना लिमये, मालवण रोटरी क्लबचे सदस्य सुहास ओरसकर, रंजन तांबे, रमाकांत वाक्कर, महादेव पाटकर यांच्या सह रोटरी क्लब डोंबिवली सन सिटीचे अमोल कामत, वंदना कामत आणि रोटरी क्लब कणकवलीतर्फे नितीन बांदेकर, वर्षा बांदेकर, नयना केसरकर तसेच भंडारी हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे व इतर शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये भंडारी हायस्कूल- ६६, शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट - १०, जय गणेश स्कुल, मालवण- ४४, कन्याशाळा, मालवण - २०, भरतगड - १४, आर. पी. बागवे हायस्कुल - ११, रेकोबा हायस्कुल, वायरी २३, देवबाग हायस्कुल - १३, ओझर विद्यामंदिर कांदळगाव- २३, माळगाव - १५, वायंगणी - २५, मसुरे इतर शाळा - २६ असे एकूण २९० विद्यार्थ्यांना स्टडी बडी’ शैक्षणिक ॲपचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी १४० ॲप रोटरी क्लब मालवणच्या प्रविणा शिंदे यांनी आणि १५० ॲप डॉ. लीना लिमये यांनी प्रायोजित केली.

टाईम्स स्पेशल

Create Lasting Impact’ या रोटरीच्या संकल्पनेला साजेसा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तंत्रज्ञानाधारित शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारा ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी डिजिटल माध्यमातून दर्जेदार शैक्षणिक साहित्य, मार्गदर्शन आणि सरावाची सुविधा उपलब्ध होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम विशेष उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाचे उत्स्फूर्त स्वागत करत ॲपचा जास्तीत जास्त उपयोग करून शैक्षणिक प्रगती साधण्याचा संकल्प केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg