loader
Breaking News
Breaking News
Foto

शेंबवणे गावचे सुपुत्र संदिप चरकरी यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - २४ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती पुनर्गठीत करण्यात आली. त्यावेळी संदिप चरकरी यांना तंटामुक्ती अध्यक्ष होण्यासाठी पूर्ण ग्रामसभेतील उपस्थित सर्वांनुमते बिनविरोध निवडून दिले. संदिप चरकरी हे विश्वकर्मा लोहार समाजाचे जिल्हा रत्नागिरी यां समाजाचे अध्यक्ष आहेत व ग्रामपंचायत शेंबवणे माजी सदस्य व अशा प्रकारे विविध क्षेत्रात त्यांची विकास कामे करण्याची तळमळ यामुळे आज त्याना पुन्हा एकदा ग्रामसभेने बिनविरोध तंटामुक्ती अध्यक्ष निवडून आणले. त्याच्यावर गावातून तालुक्यातुन शुभेच्छा सत्कारांचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित सरपंच प्रभाकर तांबे, उपसरपंच संदेश बने, ग्रामसेवक राकेश सावंत, गावप्रमुख दिलीप म्हादे, पोलीस पाटील विकास तांबे, माजी सरपंच शिवराम गोसावी, माजी सदस्य चंद्रकांत म्हादे व सितराम पेंढारी इत्यादी बहुसंख्येने उपस्थितानी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg