कणकवली २७ ऑगस्ट (प्रतिनिधी)- गणेशोत्सवासाठी मुंबईहून मोठ्या संख्येने दरवर्षी चाकरमानी कोकणात येतात. यंदा देखील बाप्पाच्या भेटीसाठी जाणार्या चाकरमानी जनतेसाठी एक गोड बातमी आहे. ९ आणि ११ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दादर रेल्वे स्थानक येथून प्लॅटफॉर्म क्र.१४ वरुन विशेष रेल्वे रवाना होणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांची गणेश भक्ताच्या सेवेसाठी १४ वर्षांची परंपरा कायम असून यावर्षी गणेशभक्त चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज झाली आहे.
गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांची ९ आणि ११ सप्टेंबर रोजी ‘मोदी एक्सप्रेस’ धावणार आहे. गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जाणार्या या विशेष रेल्वेची या वर्षीची तयारी पूर्ण झाली आहे. असून, ९ आणि ११ सप्टेंबर रोजी दादर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी १०.३० वाजता ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाच्या दिशेने रवाना होणार असल्याची घोषणा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. मुंबईहून सुटणारी ही गाडी रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी येथे पोहोचणार आहे. गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणार्या चाकरमान्यांना प्रवासात खाण्यापिण्याची व्यवस्था तसेच पिण्याचे पाणी यासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
तिकीट बुकिंगसाठी २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे. कणकवली-देवगड-वैभववाडी मतदारसंघातील चाकरमान्यांनी भाजप मंडलाध्यक्षांशी, तर रत्नागिरीतील प्रवाशांनी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. गेल्या १४ वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मोदी एक्सप्रेस’च्या माध्यमातून चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जात आहोत. दरवर्षी प्रवाशांच्या चेहर्यावरचा आनंद आणि समाधान पाहून मनापासून समाधान वाटते. यंदाही नाचत-गाजत आपल्या गावाकडे जाण्यासाठी ‘मोदी एक्सप्रेस’ सज्ज आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.आपली हक्काची मोदी एक्सप्रेस पकडा आणि गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी गावाकडे जावूया, असे आवाहनही मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
























































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.