देवगड (प्रतिनिधी) - रक्षाबंधनाच्या पवित्र पर्वानिमित्त श्री भगवती माध्यमिक विद्यालय, कोटकामते येथे विद्यार्थिनींच्या वतीने देवगड पोलीस स्थानकातील पोलीस बांधवांना राखी बांधून स्नेह, कृतज्ञता व सुरक्षिततेची भावना व्यक्त करणारा भावस्पर्शी कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उमलमुगले, हेड कॉन्स्टेबल गणपती गावडे, पोलीस कॉन्स्टेबल महाले महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम, सारंग, पोलीस पाटील, मिठबावकर, तसेच संस्था उपाध्यक्ष संजीव मेजारी, संस्था सचिव सचिन कोकम, संस्था कार्यकारिणी सदस्य गुरुदास घाडी, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा सण नसून समाजाच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचीही एक सुंदर संधी आहे. याच भावनेतून विद्यार्थिनींनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला मानवंदना दिली. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उमलमुगले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना व्यसनमुक्ती, सायबर गुन्हे, मोबाईल व इंटरनेटचा सुरक्षित वापर तसेच वैयक्तिक सुरक्षितता याबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया व डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने वापर करावा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि संशयास्पद बाबी निदर्शनास आल्यास तत्काळ पालक, शिक्षक किंवा पोलिसांची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले. महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम यांनीही विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन करताना महिला व मुलींची सुरक्षितता, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, मोबाईलचा योग्य वापर आणि संकटाच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी याबाबत उपयुक्त माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या स्नेहबंधाला सामाजिक बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा आणि सुरक्षिततेच्या संदेशाची सुंदर जोड मिळाली. पोलीस बांधव आणि विद्यार्थी यांच्यातील हा स्नेहसंवाद विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या देवगड पोलीस स्थानकातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व सर्व संबंधितांचे श्री भगवती माध्यमिक विद्यालयाच्या संपूर्ण शाळा परिवाराच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जपलेला हा स्नेहबंध आणि सुरक्षिततेचा दिलेला संदेश विद्यार्थ्यांच्या मनात कायम स्मरणात राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.







12.jpg)











































.jpg)







.jpg)


























































































































































_(1)_(1).jpg)












































































































































_(1).jpg)
















































































































11.jpg)






6.jpg)






















10.jpg)































































































































.jpg)



















































































































.jpg)
















.jpg)












































9.jpg)






















































.jpg)









.jpg)













































.jpg)








































_(1)_(1).jpg)




























































.jpg)

















































_(1)2.jpg)






_(1)1.jpg)





_(1).jpg)


.jpg)







































_(1).jpg)

















































































.jpg)










.jpg)
.jpg)


























































































































_(1)1.jpg)







.jpg)


































































































5.jpg)























4.jpg)


.jpg)


































.jpg)






























_(1)_(1).jpg)
.jpg)

















































































































































































































































_(1).jpg)






























































































































































































































































































2.jpg)










1.jpg)
















3.jpg)





































































_(1)1.jpg)


































































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)
























































































































































































































































































































































2.jpg)



















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.