loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार दीपक केसरकर यांची ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे आग्रही मागणी; दोडामार्ग शिक्षण विभागाची आस्थापना मंजूर करून रिक्त पदे भरण्याचे आश्वासन

सावंतवाडी, (प्रतिनिधी) : दोडामार्ग पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील मंजूर नसलेली कर्मचारी आस्थापना तात्काळ मंजूर करून रिक्त पदे भरावीत, अशी आग्रही मागणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडे केली आहे. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंत्री योगेश कदम यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घालून लवकरात लवकर आस्थापना मंजूर करून पदे भरण्याचे आश्वासन दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन अनेक वर्षे उलटली तरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला शासनाकडून अद्याप स्वतंत्र कर्मचारी आस्थापना मंजूर झालेली नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील ३१ तालुक्यांमध्ये ही समस्या असून, कोकणातील दोडामार्ग तालुक्याचा विशेष बाब म्हणून विचार करावा आणि येथील शिक्षण विभागाला आस्थापना मंजूर करून पदे भरावीत, याकडे आमदार केसरकर यांनी लक्ष वेधले.

टाईम्स स्पेशल

​यापूर्वीही आमदार केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे दोडामार्ग शिक्षण विभागासाठी शिक्षण विस्तार अधिकारी संवर्गाची दोन पदे मंजूर झाली आहेत. या पार्श्वभूमीवर उर्वरित कर्मचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी त्यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg