loader
Breaking News
Breaking News
Foto

दोन वर्षांनंतरही बांधकाम ठप्प; आरपीआयच्या पाठपुराव्याला यश ३० टक्के निधी प्राप्त, येत्या आठवड्यात काम सुरू करण्याचे बांधकाम विभागाचे आश्वासन

खेड : खेड नगरपरिषद हद्दीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन होऊन दोन वर्षांचा कालावधी होत आला असतानाही प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झालेली नव्हती. या रखडलेल्या कामाबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), तालुका खेडच्या वतीने प्रशासनाकडे जाब विचारत काम तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली. ना. योगेशदादा कदम यांच्या पुढाकाराने २४ ऑगस्ट २०२४ रोजी ना. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सभागृहाचे भूमिपूजन झाले होते. मात्र भूमिपूजनानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिक तसेच आंबेडकरी समाजामध्ये नाराजी व्यक्त होत होती. दापोली विधानसभा मतदारसंघात ना. योगेशदादा कदम यांच्या पुढाकारातून विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून अनेक प्रलंबित कामांना गती मिळत असल्याची सकारात्मक भूमिका आरपीआयने घेतली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून मतदारसंघातील अनेक विकासकामांना गती मिळत आहे. त्यांच्या विकासकामांबाबत आमचा सकारात्मक दृष्टिकोन आहे. मात्र खेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे कामही त्याच गतीने मार्गी लागणे आवश्यक आहे. एका बाजूला विविध विकासकामे सुरू असताना या महत्त्वाच्या सभागृहाचे काम दोन वर्षे प्रलंबित राहणे योग्य नाही, अशी भूमिका आरपीआयचे युवक कोकण प्रदेश अध्यक्ष सुशांतभाई सकपाळ यांनी मांडली. सभागृहाच्या कामासाठी निधी उपलब्ध नसल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे निधीची नेमकी स्थिती काय, याबाबत आरपीआयने प्रशासनाकडे माहिती मागितली होती. याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे सांगितले असून, येत्या आठवड्यात सभागृहाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या कामाला अखेर सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टाईम्स स्पेशल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह हे केवळ एक बांधकाम नसून खेड शहरातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. दोन वर्षांपासून काम रखडले होते. आता बांधकाम विभागाने ३० टक्के निधी प्राप्त झाल्याचे सांगून येत्या आठवड्यात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाने दिलेला शब्द पाळून प्रत्यक्ष काम तातडीने सुरू करावे, असे सुशांतभाई सकपाळ यांनी स्पष्ट केले. योगेशदादा कदम यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील विविध विकासकामांना गती मिळत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे कामही तातडीने मार्गी लागले पाहिजे. आता केवळ आश्वासन नको, तर येत्या आठवड्यात प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले दिसले पाहिजे. अन्यथा आरपीआयच्या वतीने लोकशाही मार्गाने जनतेला सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सकपाळ यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg