loader
Breaking News
Breaking News
Foto

दीक्षित फाउंडेशनच्या तालुकास्तरीय भव्य प्रश्नमंजुषा स्पर्धेत सृष्टी नाईकधुरे प्रथम

देवगड (प्रतिनिधी) - निळकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित यांच्या पुण्यतिथीनिमित्त दीक्षित फाउंडेशन, देवगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचा अंतिम सोहळा मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी शेठ म. ग. हायस्कूल, देवगड येथील संगणक कक्षाच्या सभागृहात उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. ज्ञान, जिज्ञासा, वाचनसंस्कृती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला देवगड तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तब्बल ७०४ विद्यार्थ्यांमधून शालेय स्तरावर निवड झालेले प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी या तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांच्या समवेत शिक्षक व पालक प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेत मोंड हायस्कूलची सृष्टी मंगेश नाईकधुरे हिने प्रथम क्रमांक पटकावला. किंजवडे हायस्कूलची वैदही प्रताप मांडवकर हिने द्वितीय क्रमांक, तर सौंदाळे हायस्कूलचा दूर्वास प्रकाश राणे याने तृतीय क्रमांक मिळविला. पडेल हायस्कूलची शमिका जयवंत माळगवे हिने उत्तेजनार्थ प्रथम, तर मोंड हायस्कूलची अक्षरा राजेश अनभवणे हिने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळविला.

टाईम्स स्पेशल

विजेत्या विद्यार्थ्यांना रोख रकमेची पारितोषिके आणि आकर्षक ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाचे पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी मनापासून कौतुक केले. कार्यक्रमास देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष निरंजन दीक्षित, लोकल कौन्सिलचे सचिव आणि समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. अविनाश माणगावकर, शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंगाडे, स्थानीय समितीचे सदस्य विलास रूमडे, स्थानीय समितीचे खजिनदार द.म. जोशी, देवगड एज्युकेशन बोर्डाचे उपाध्यक्ष सदानंद पवार ,मुख्याध्यापक प्रविण खडपकर तसेच आत्मचरित्राचे अभिवाचन करणाऱ्या आज्ञा कोयंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg