पनवेल :- श्रावणाच्या हिरवाईत, परंपरेच्या सुगंधात आणि स्त्रीशक्तीच्या उत्साहात ‘श्रावण सखी २०२६’ हा आनंद सोहळा आंगण बँक्वेट्स, नवीन पनवेल येथे दिमाखात संपन्न झाला. सखी इव्हेंट्स व इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला सखींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीच्या प्रेसिडेंट स्नेहल कल्याणकर, सेक्रेटरी विजेता कोठारी,पास्ट प्रेसिडेंट ध्वनी तन्ना, क्लब सदस्या, सखी इव्हेंट्सच्या संस्थापिका अरुंधती बंदसोडे यांच्या कल्पक संकल्पनेतून व काटेकोर नियोजनातून साकारलेल्या या सोहळ्यात श्रावणातील पारंपरिक खेळ, मंगळागौरीची गाणी, नृत्य आणि पारंपरिक वेशभूषेने वातावरण अक्षरशः उत्साहाने भारून गेले.
कार्यक्रमाला माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, माजी नगरसेविका सुहासिनी शिवनेकर, नवीन पनवेलच्या नगरसेविका राजश्री वावेकर, पीएसएमच्या शीतल ठक्कर तसेच जीएमआरआरसीच्या शीतल मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शीतल ठक्कर यांनी परीक्षक म्हणून उत्कृष्ट कार्य बजावत सहभागी सखींच्या कलागुणांचे बारकाईने निरीक्षण केले. उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषेसाठी शुभांगी दीक्षित, बेस्ट परफॉर्मन्ससाठी रूपाली शेलवले आणि बेस्ट नृत्यासाठी ज्योती यांना गौरविण्यात आले. तर वसुधा, रुचिता आणि विशाखा यांनी लकी ड्रॉची बक्षिसे पटकावली. अरुंधती बंदसोडे व अर्चना पाटील यांच्या ओघवत्या निवेदनाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. मंगळागौरीच्या सुरेल गीतांनी वातावरणात पारंपरिक संस्कृतीची अनुभूती निर्माण केली, तर तबलावादक मनोज खाकल यांच्या तालबद्ध तबलावादनाने या आनंदसोहळ्याला सुरेल साथ लाभली.
सर्व सहभागी सख्या, अतिथी, सहकारी, कलाकार आणि कार्यक्रमाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जोडलेल्या प्रत्येकाच्या मनापासूनच्या सहकार्यामुळेच हा सोहळा अधिक सुंदर, उत्साही आणि संस्मरणीय ठरला. प्रत्येक सखीच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि उत्साह हीच ‘श्रावण सखी २०२६’ च्या यशाची खरी पावती ठरली. विशेष म्हणजे, या कार्यक्रमातून प्राप्त होणारा निधी ‘हॅप्पी स्कूल’ या सामाजिक प्रकल्पासाठी उपयोगात आणला जाणार असून, मनोरंजनासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा सुंदर संदेश या उपक्रमातून देण्यात आला. परंपरेला आधुनिकतेची सुंदर जोड देत, आनंदाचे क्षण समाजोपयोगी कार्याशी जोडणारा ‘श्रावण सखी २०२६’ हा सोहळा सखी इव्हेंट्स, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटी आणि सर्व सहकार्य करणाऱ्या सख्यांच्या एकजुटीचा, स्त्रीशक्तीच्या उत्साहाचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर आविष्कार ठरला.





























































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.