वरवेली (गणेश किर्वे) - महाराष्ट्र सरकारच्या कर्जमाफीच्या धोरणामध्ये मच्छिमारांची सर्व स्तरातील कर्जे माफीच्या निकषात समाविष्ठ करून घेणेबाबत गुहागर तालुक्यातील वेलदूर सह, मच्छि.व्यावसायिक संस्थेच्या वतीने संस्थेचे चेअरमन विठ्ठल उर्फ बावा भालेकर, सेक्रेटरी विठोबा दाभोलकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नामदार नितेश राणे यांना निवेदन दिले. शासनाने जाहीर केलेली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०२६ या योजनेचा संदर्भ देत त्यांनी निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने मच्छिमार व्यवसायाला कृषीचा दर्जा देऊन शेतकर्यांप्रमाणे मच्छिमारांचीही कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्या बद्दल सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच गेल्या कित्येक वर्षांपासून मच्छिमारांची मागणी होती की, शेतकर्यांप्रमाणे मच्छिमारांचे देखील कर्ज माफ व्हावे.
परंतु इतक्या वर्षाच्याप्रतीक्षेनंतर सरकार निर्णय घेत असताना मच्छिमार संस्थांच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या मध्यम मुदत कर्ज, अल्पमुदत कर्ज व उलाढालीसाठी दिलेल्या थकीत अॅडव्हान्स रक्कमा, मच्छिमार क्रेडिटकार्ड तसेच जिल्हा मध्यवर्ती बँका, सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बचत गट या सर्वांचा कर्जमाफीच्या निकषात समावेश व्हावा. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या मच्छिमारांची गेली कित्येक वर्षांपूर्वीची राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेतून मासेमारी नौकांचे यांत्रीकरण योजनेतून घेतलेल्या अर्थसहाय्यापैकी काही मासेमारी नौकांची कर्जे थकीत असून त्यापैकी बहुतांशी नौका नष्ट झाल्या असून नौकेचे गटप्रमुख आणि गट सदस्यही हयात नाहीत.
तरी अशी असलेली थकीत कर्ज ही माफ करण्यात यावीत. तसेच मागील काही वर्षातील दुष्काळ सदृश परिस्थिती व मासेमारी हंगामासाठी बंदी काळाची मुदत वाढवल्यामुळे मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्याची तरतूदही यानिमित्ताने करण्यात यावी अशी नम्र विनंती सर्व मच्छीमारांचे वतीने करण्यात येत आहे. सदर निवेदनाच्या प्रती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (प.दु.म.) रत्नागिरी, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी. सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी), गुहागर. यांना देण्यात आल्या आहेत.





























































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.