loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी कस्टम्स विभागाची ’स्वच्छता ही सेवा’ मोहीम, उत्साहात

रत्नागिरी: (जमीर खलफे) - पर्यावरण संरक्षण आणि समुद्रकिनार्‍यांचे आरोग्य जपण्याच्या ध्येयाने पुणे कस्टम्स आयुक्तालयाच्या अंतर्गत येणार्‍या रत्नागिरी कस्टम्स विभागाच्यावतीने गुरुवारी, २७ ऑगस्ट २०२६ रोजी ’स्वच्छता ही सेवा २०२६’ या अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. रत्नागिरीतील प्रसिद्ध पांढरा समुद्र आणि मुरुगवाडा जेटी परिसरातील किनार्‍यावर ही मोहीम पार पडली. या उपक्रमात रत्नागिरी कस्टम्स विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन श्रमदान केले. किनार्‍यावर साचलेला प्लास्टिकचा कचरा, टाकाऊ पॉलिथिन पिशव्यासह इतर टाकाऊ वस्तू गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या किनारी भागाची दुरवस्था दूर करून तो स्वच्छ आणि सुंदर बनवणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून रत्नागिरी कस्टम्स विभागाने केवळ किनारा स्वच्छ केला नाही, तर नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृतीचा एक सशक्त संदेशही दिला. समुद्रातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि सागरी जीवसृष्टीचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागून किनार्‍यावर कचरा करू नये, असे आवाहनही या प्रसंगी कस्टम्स प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. शासकीय विभागाच्या या प्रत्यक्ष कृतीमुळे स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी रत्नागिरी कस्टम्स विभागाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg