loader
Breaking News
Breaking News
Foto

मुचरी जि. प. गटात रंगणार श्रावण सखींचा जल्लोष!

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : श्रावणाची हिरवीगार चाहूल, सनई-चौघड्याचा मंगल स्वर आणि पारंपरिक मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह... अशा श्रावणी वातावरणात मुचरी जिल्हा परिषद गटातील महिलांचा जल्लोष रंगणार आहे. महिलांच्या पारंपरिक कलागुणांना उजाळा देतानाच आधुनिकतेची जोड देण्यासाठी भव्य मंगळागौर व ‘स्मार्ट श्रावण सखी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री तथा आमदार उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता लोवले-मयूरबाग येथील शुभगंधा हॉल येथे हा महिला विशेष सोहळा रंगणार आहे. उदय सामंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुचरी जि. प. गटातील महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंगळागौर म्हटली की फुगड्या, झिम्मा, फेर, पारंपरिक गाणी आणि हास्य-विनोदाने भरलेले वातावरण डोळ्यांसमोर उभे राहते. याच समृद्ध परंपरेचा जागर या कार्यक्रमातून होणार आहे. त्याचबरोबर ‘स्मार्ट श्रावण सखी’ स्पर्धेतून महिलांच्या विविध कलागुणांना आणि व्यक्तिमत्त्वाला व्यासपीठ मिळणार आहे. कार्यक्रमाला शिवसेना महिला जिल्हा प्रमुख तथा नगराध्यक्ष, रत्नागिरी शिल्पाताई सुर्वे तसेच शिवसेना महिला तालुका प्रमुख, कसबा जि. प. गट कांचनताई नागवेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या उपक्रमाचे आयोजन माधवी मनोहर गिते, शिवसेना महिला विभाग प्रमुख, जि. प. मुचरी गट तथा जिल्हा परिषद सदस्या, मुचरी जि. प. गट यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुचरी जि. प. गटातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या सज्ज झाल्या आहेत. श्रावणातील भक्तिमय आणि उत्साही वातावरण, मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांची रंगत, महिलांच्या कलागुणांचे सादरीकरण आणि सखींच्या हास्य-विनोदाने मुचरीत श्रावणाचा रंग अधिकच खुलणार आहे. या अनोख्या महिला मेळाव्याचा आनंद घेण्यासाठी मुचरी जि. प. गटातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg