loader
Breaking News
Breaking News
Foto

सातेरी मंदिर परिसरातील व्होल्टेज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा, नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील सातेरी मंदिर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या कमी-जास्त व्होल्टेजच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात नगरसेवक तपस्वी मयेकर यांचे प्रयत्न फळाला आले आहेत. तपस्वी मयेकर यांनी नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करत महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा केल्याने सातेरी मंदिर परिसरात नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला आहे. सातेरी मंदिर परिसरातील नागरिकांना अनेक वर्षे कमी व्होल्टेजचा त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा वीजपुरवठ्यातील व्होल्टेज कमी-जास्त झाल्याने नागरिकांची फ्रिज, टीव्ही, मिक्सर, विद्युत उपकरणे निकामी होण्याच्या घटना घडत होत्या. काही वेळा मिक्सरसारखी उपकरणेही व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक त्रस्त झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

न.पा. निवडणुकीदरम्यान नागरिकांनी ही समस्या तपस्वी मयेकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सातेरी मंदिर परिसरातील वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी, नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी प्रयत्न करण्याचा शब्द नागरिकांना दिला होता. त्यानंतर त्यांनी महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून महावितरणतर्फे सातेरी मंदिर परिसरात नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होऊन नागरिकांना कमी व्होल्टेजच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे. हे काम पूर्ण झाल्याबद्दल नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी महावितरणचे मयेकर, मेहत्रे, वायरमन तसेच सहकार्य करणाऱ्या सातेरी मंदिर परिसरातील सर्व नागरिकांचेही आभार व्यक्त केले. नगरसेवक तपस्वी मयेकर यांच्या प्रयत्नांचे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg