खेड : रत्नागिरी जिल्ह्यात अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष समुपदेशन व जनजागृती अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी युवा रोजगार जनहक्क संघर्ष संघ, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दि. ३ ऑगस्ट २०२६ रोजी खेड पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीसंदर्भात एक गंभीर गुन्हा दाखल झाला असून आरोपीला त्याच दिवशी अटक करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शाळा, महाविद्यालये, एस.टी. बसेस, सार्वजनिक कार्यक्रम आणि गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
त्यामुळे केवळ गुन्हा घडल्यानंतर कारवाई न करता, गुन्हे घडूच नयेत म्हणून पोलीस विभाग, शिक्षण विभाग आणि महसूल प्रशासनाने संयुक्तपणे शाळा-महाविद्यालयांमध्ये समुपदेशन कार्यक्रम घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन, अयोग्य वर्तन ओळखणे, संकटाच्या वेळी मदत कशी मागावी, तसेच पालक व शिक्षकांची जबाबदारी याबाबत मार्गदर्शन करावे. तसेच एस.टी. प्रवास व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी, अशीही मागणी आहे. अशा संवेदनशील घटनांबाबत अफवा, अपुरी माहिती पसरून सामाजिक तणाव निर्माण होऊ नये, घटनेला जातीय रंग येऊ नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, तसेच आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन संस्थापक अध्यक्ष बाळा खेडेकर, तालुका अध्यक्ष मिलिंद जाधव आणि शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी दिले आहे.
या निवेदनाच्या प्रती प्रांत अधिकारी खेड, उपविभागीय पोलीस अधिकारी खेड, तहसीलदार खेड आणि पोलीस निरीक्षक खेड यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी संस्थापक बाळाराम खेडेकर, अध्यक्ष मिलिंद जाधव, उपाध्यक्ष सुनिल जाधव, खजिनदार विशाल सागवेकर, शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे, सदस्य अरुण लोंढेकर, सदस्य सिमा जाधव, अनिल तांबे, श्रीकांत सकपाळ, अनंत कांबळे, बशिर मुजावर (माजी नगरसेवक), शेखर पाटणे (शहर प्रमुख), कौसर मुजावर (माजी नगरसेवक), वहिद भाई कडवेकर, स्वरूप भैरवनकर उपस्थित होते.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.