loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा परिषद सदस्य सुशील भायजे यांनी साधला विध्यार्थ्यांशी संवाद

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील धामापूर. तर्फे संगमेश्वर जिल्हा परिषद गटाचे विद्यमान जि.प.सदस्य सुशिल भायजे यांनी नुकतीच आंबव पोंक्षे येथील जि.प. शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका प्राची पाठणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी सरपंच शेखर उकिर्डे शाळा समिती व्यवस्थापन अध्यक्ष प्रकाश कदम उपस्थित होते. भायजे यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या स्वरा शिगवण व मंथन बाष्टे या दोघांना वैयक्तीक बक्षिस देऊन सन्मानित केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांशी छोट्या, छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच शाळा इमारत, विध्यार्थी व शिक्षक संख्या, मध्यान भोजन, एकल पालक, अपंग विदयार्थी पाठयपुस्तका सोबत भौतिक सुविधा, शाळेचा परिसर आदीची माहिती घेऊन शिक्षकांशी गुणवत्ता व विद्यार्थी संख्येवाढ विषयी सविस्तर चर्चा केली. या वेळी सर्व अध्यापक, व विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg