loader
Breaking News
Breaking News
Foto

येत्या ३ सप्टेंबरपासून बुरंबाडमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड येथे, विष्णू मंदिरात श्रावण कृष्ण सप्तमी ते श्रावण कृष्ण नवमी अर्थात ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ३ व ४ रोजी सकाळी ८ वा.श्रींची पवमानाभिषेक पूजा होईल. रात्री ८.३० वा.आरती मंत्रपुष्प, श्रींची मिरवणूक (छबिना) निघेल. रात्री ११ वाजता कीर्तन होईल. ४ रोजी रात्री जन्मोत्सवाचे कीर्तन रंगेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि ५ रोजी सकाळी ८ वा पवमानाभिषेक पूजा, १० वा. दहिकल्याचे कीर्तन, बाळगोपाळांचे विविध खेळ होतील. हंडी फोडणे, नवसपूर्ती, दहिकाला होईल. दु.२ वाजता महाप्रसाद होईल. रात्री ९ वाजता आरती मंत्रपुष्प, व रात्री १० वा.हौशी भक्तांचे 'अशा रंगल्या रात्री' हा कार्यक्रम होईल. उत्तर रात्री १ वा.लळीताचे कीर्तन होईल.

टाईम्स स्पेशल

यावर्षी कीर्तनसेवेला पुण्याचे सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश बुवा धानोरकर (जोशी) लाभले आहेत. या उत्सवानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रमाना उपस्थित राहावे असे आवाहन न्यासाचे अध्यक्ष लक्ष्मण साठे व सचिव विकास जाधव यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg