loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे एमआयडीसीतील कोकाकोला कंपनीचे सांडपाणी उघड्यावर; ग्रामस्थ संतप्त

खेड/रत्नागिरी (प्रतिनिधी) - रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे अतिरिक्त एमआयडीसीमधील कोकाकोला कंपनीचे सांडपाणी गुरुवार २७ ऑगस्ट रोजी उघड्यावर सोडल्याचा प्रकार सकाळी निदर्शनास आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या सांडपाण्यामुळे परिसरातील शेती आणि पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत असून, या प्रकारामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनीकडूनच सांडपाणी उघड्यावर सोडले जात असेल, तर लोटे एमआयडीसीतील इतर रासायनिक कंपन्यांकडून होणार्‍या प्रदूषणावर नियंत्रण कसे ठेवले जाते, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोजगार आणि स्थानिकांच्या विविध प्रश्नांमुळे यापूर्वी चर्चेत राहिलेल्या या कंपनीच्या पर्यावरणीय जबाबदारीवरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या सांडपाण्यामुळे शेती, माती आणि परिसरातील पर्यावरणावर नेमका काय परिणाम झाला आहे, याची संबंधित यंत्रणांनी तातडीने पाहणी करून तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन सांडपाणी सोडण्याच्या प्रकाराची चौकशी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. दरम्यान, उघड्यावर सांडपाणी सोडण्याचे प्रकार नेमके कशामुळे घडले आणि त्यावर संबंधित प्रशासन व प्रदूषण नियंत्रण यंत्रणा काय कारवाई करणार, याकडे आता ग्रामस्थांचे आत लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg