loader
Breaking News
Breaking News
Foto

निसर्ग हाच आपला खरा रक्षक’ हा संदेश देत सरफरे विद्यालयातील विद्यार्थिनींनी झाडांना बांधली राखी

संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्‍वर येथील दादासाहेब सरफरे विद्यालय व बुरंबी पंचक्रोशी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सांस्कृतिक विभाग प्रमुख उपशिक्षक सुहास गेल्ये यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाचे महत्त्व, भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा व परस्पर संरक्षणाची भावना याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी वर्गनिहाय विद्यार्थ्यांनी आपल्या भगिनींना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. ’निसर्ग हाच आपला खरा रक्षक’ हा संदेश देत विद्यालयातील विद्यार्थिनींनी विद्यालय संकुलाजवळील झाडांना राखी बांधली. या उपक्रमातून वृक्षसंवर्धन व पर्यावरणरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये निसर्गभान जागृत करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र बुरंबी तेर्ये आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकाना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी राखी बांधून त्यांच्या निःस्वार्थ सेवेला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी व कृतज्ञतेचा संदेश दिला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश विरकर, पर्यवेक्षक महाविर साठे व सहाय्यक शिक्षिका सौ.भोसले उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व वर्गशिक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg