loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्योती कदम यांना राज्यस्तरीय ‘आदर्श माता’ पुरस्कार

खेड : आई म्हणजे केवळ कुटुंबाची आधारवड नसून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणारी संस्कारशक्ती असते. मुलांच्या यशामागे आईचा त्याग, कष्ट आणि संस्कार यांचे मोठे योगदान असते. अशाच मातृत्वाचा आणि संस्कारांचा गौरव पुणे येथे करण्यात आला. राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेशदादा कदम यांच्या मातोश्री ज्योती रामदास कदम यांना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने दिला जाणारा मानाचा राज्यस्तरीय ‘आदर्श माता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुणे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांच्या हस्ते सौ. ज्योती कदम यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मातृत्वातील त्याग, संस्कार, कुटुंबासाठी केलेले योगदान आणि मुलांच्या जडणघडणीत बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांचा गौरव म्हणून त्यांना हा सन्मान देण्यात आला. या प्रसंगी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर तसेच उपाध्यक्ष ॲड. शार्दूलराव जाधवर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कदम कुटुंबातील दोन कर्तृत्ववान सुपुत्रांनी सार्वजनिक जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या जडणघडणीत आई म्हणून ज्योती रामदास कदम यांनी दिलेले संस्कार, मूल्ये आणि पाठबळ महत्त्वाचे ठरले. त्यामुळे त्यांना मिळालेला हा पुरस्कार केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून मातृत्व, संस्कार आणि त्यागाचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

मुलांच्या यशामागे आईची भूमिका अनेकदा पडद्यामागे राहते. मात्र, अशा मातांच्या योगदानाची समाजाने दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे ही प्रेरणादायी बाब आहे. ज्योती कदम यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय पुरस्कारामुळे कदम कुटुंबीयांसह त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आईच्या संस्कारांची शिदोरी घेऊन मुलांनी यशाची उंच शिखरे गाठावीत आणि त्या यशामागील मातेच्या त्यागाला समाजाकडून सन्मान मिळावा, याचे सुंदर उदाहरण म्हणून ज्योती कदम यांना मिळालेल्या या पुरस्काराकडे पाहिले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg