loader
Breaking News
Breaking News
Foto

गोळवली बौद्धवाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा; सुपुत्र डॉ. राहुल मंगेश गमरे यांची यशस्वी वाटचाल.

गोळवली : गोळवली बौद्धवाडीचे सुपुत्र राहुल मंगेश गमरे यांनी आपल्या अथक मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर एमबीबीएस (MBBS) शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून डॉक्टर ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गोळवली बौद्धवाडी तसेच मुंबई मंडळाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. राहुल यांनी फिलिपाईन्स येथे चार वर्षांचे एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. या यशामागे त्यांचे आई-वडील श्री. मंगेश गमरे व सौ. वैशाली गमरे यांचे मोलाचे मार्गदर्शन, त्याग आणि प्रोत्साहन आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाची वाटचाल सुरू ठेवून राहुल यांनी मिळवलेले हे यश गोळवली बौद्धवाडीतील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि संपूर्ण गोळवली गावात आनंदाचे वातावरण आहे. डॉ. राहुल मंगेश गमरे यांच्या पुढील वैद्यकीय कारकिर्दीसाठी मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा! त्यांनी आपल्या ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग समाजसेवेसाठी करून एक संवेदनशील व यशस्वी डॉक्टर म्हणून लौकिक मिळवावा, हीच सदिच्छा व्यक्त केली जात आहे . “जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर गोळवली बौद्धवाडीच्या सुपुत्राने डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले—ही संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब आहे.” म्हटली जात आहे .

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg