loader
Breaking News
Breaking News
Foto

रघुवीर घाटात अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच मुभा

खेड (प्रतिनिधी) - तालुक्यातील रघुवीर घाटातील वाहतूक सीमित स्वरूपातच सुरू झाली आहे. स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी केवळ एसटी महामंडळाच्या बसेस आणि अत्यावश्यक सेवेतील वाहननांनाच खबरदारीच्या उपाययोजनांसह प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. पर्यटनासाठी जाणार्‍या खासगी वाहनांना बंदी असली तरी काहीजण लपूनछपून जात रघुवीर घाटात पर्यटनाचा आनंद लुटत असल्याची माहिती समोर आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गतमहिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचे सत्र सुरू होते. एका बाजुकडील रस्ताही खचल्याने मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनाने पर्यटनासाठी व खासगी वाहनांसाठी घाटातून वाहतुकीसाठी घातलेली बंदी अजूनही कायमच आहे.

टाईम्स स्पेशल

रघुवीर घाटात सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुरूस्तीची कामे हाती घेण्यात आली असून मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही सुरू आहेत. मार्गाच्या दुरूस्तीच्या कामानुसार स्थानिक प्रशासनाकडून वेळावेळी वाहतूक नियमात बदल केले जात आहेत. खासगी वाहनांना रघुवीर घाटातून प्रवास करण्यास अटकाव करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg