loader
Breaking News
Breaking News
Foto

डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, लांजा आयोजित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा उत्साही वातावरणात पार

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित, डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, लांजा आयोजित रत्नागिरी जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन पुरस्कृत, लांजा तालुका मर्यादित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूल, लांजा येथे मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्या स्पर्धेत तालुक्यातील एक हजार विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. या स्पर्धा डी.जे. सामंत इंग्लिश स्कूल येथे घेण्यात आल्या स्पर्धेची सुरूवात पालकमंत्री उदय सांमत, आमदार किरण सामंत यांच्या हस्ते झाली. या प्रसंगी शाळेचे संस्थापक अण्णा सामंत, सभापती मानसी आंबेकर, लांजाच्या नगराध्यक्षा सावली कुरूप, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, आदी मान्यवरांसह, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सहभागी झालेले छोटे खेळाडू हेच उद्याचे भविष्य आहेत, केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून चालत नाही शरीराने आणी मनानेही तंदरुस्त असणे आजच्या तरुण पीढीसाठी महत्वाचे आहे. खेळामुळे मुलांमध्ये जिद्द, शिस्त, संघभावना आणि पराभवाने खचून न जाता पुन्हा उभे रहाण्याची जिद्द निर्माण होते. या मॅरेथॉन स्पर्धेत धावणारा प्रत्येक बालस्पर्धक विजेता आहे. कोण पहीले आले, दुसरे आले हे महत्वाचे नाही स्पर्धेत भाग घेणे महत्वाचे असल्याचे म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेत १२ वर्ष मुलामध्ये सनिदेओल राजू पासवान, सत्यम सचिन पवार, साहिल सोमनाथ चव्हाण, यांनी प्रथम तीन अनुक्रमे नंबर मिळविले. तर उत्तेजनार्थ वर्धन विकास चव्हाण, वेध रमाकांत हरमले, १२वर्ष मुलींमध्ये श्रावणी संतोष मोरे, आरूषी अमोल गुरव, आराध्या विद्याधर करंबेळे, प्रथम तीन अनुक्रमे व उत्तेजनार्थ वैष्णवी काशिनाथ दिनकर, माही शशांक उपशेट्ये. १४वर्ष मुलांमध्ये बॉबिदेओल राजू पासवान, आर्यन रोहीत वर्मा, आदित्य अजय माटळ, प्रथम तीन अनुक्रमे व उत्तेजनार्थ अथर्व रमेश भुवड, हार्दिक रमेश भुवड, १४ वर्ष मुलींमध्ये आराध्या गुरुदास माने, स्वप्ना संतोष मोरे, आर्या विजय टोळे, प्रथम तीन अनुक्रमे व उत्तेजनार्थ शितल राजेंद्र गुरव, वंदना अमित नामये १६ वर्ष मुलामध्ये स्वव संजय नामये, सोहम सहदेव करळकर, प्रसाद अनिल पापटे, प्रथम तीन अनुक्रमे व उत्तेजनार्थ संस्कार संजय चव्हाण, राज उमेश नामये, १६वर्ष मुलींमध्ये स्वरा संजय उपशेट्ये, मानवी सूर्यकांत बंडबे, सिध्दी संजय मोसमकर, प्रथम तीन अनुक्रमे व उत्तेजनार्थ पुर्वी सत्यवान राणे, श्रेया संदीप घडशी. हे विद्यार्थी विजेते ठरले आहेत. या विजेत्या प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम व मेडल, व उत्तेजनार्थ म्हणून नंबर मिळविलेल्या स्पर्धकांना रोख रक्कम, बक्षिसे व सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व छत्री मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे नेटके नियोजन भाई कामत व संजय तेंडुलकर यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg