संगमेश्वर (प्रतिनिधी) : संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद शिक्षकांच्या करण्यात आलेल्या कामगिरी बदल्यांवरून शिक्षक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काही शिक्षकांच्या कामगिरीच्या ठिकाणांमध्ये ४० ते ६० किलोमीटर पर्यंतचे अंतर असल्याने एवढ्या दूरच्या ठिकाणी कामगिरी बदल्या कोणत्या प्रशासकीय निकषांच्या आधारे करण्यात आल्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, राजवाडी सुर्वेवाडी शाळेतील शिक्षक संतोष कदम यांची कामगिरी तुरळ हरेकरवाडी येथे, तर हरेकरवाडी येथील शिक्षिका यादव बाई यांची कामगिरी शिरंबे नं. २ येथे करण्यात आली आहे. शिरंबे नं. २ येथील नितीन थोरात यांची कामगिरी शिंदे आंबेरी येथे करण्यात आल्याची माहिती आहे. थोरात यापूर्वी शिंदे आंबेरीचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. कळंबुशी नं. २ येथील शिक्षण सेवक ज्ञानेश्वर मार्कंड यांची कामगिरी चाफवली येथे करण्यात आली आहे. कासारकोळवण येथील हर्डीकर आणि निढळेवाडी येथील गीडये यांची कामगिरी एकमेकांच्या शाळांमध्ये कामगिरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहाराचे आरोप होत असले तरी त्याची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या आरोपांची निष्पक्ष चौकशी होण्याची मागणी होत आहे.
धामणी नं. २ येथील शर्मा गमरे यांची कामगिरी परचुरी नं. २ येथे करण्यात आली असून, गोळवली-जांभूळवाडी येथील मुनिरा कापडी यांची कामगिरी धामणी नं. २ येथे करण्यात आल्याची माहिती आहे.पिरंदवणे येथील योगेश मुळये यांची कामगिरी देवरूख नं. ३ येथे करण्यात आली आहे. या कामगिरीच्या संदर्भातही आर्थिक व्यवहाराचे आरोप होत असून, त्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. फणसवणे नं. १ येथील शिक्षिका सुजाता हसबे यांची कामगिरी संगमेश्वर नं. १ येथे, तर देवपाट येथील शिक्षक विकास फटकरे यांची कामगिरी फणसवणे नं. १ येथे करण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान, काटवली नं. २ शाळेतील शिक्षक चंद्रकांत आंब्रे यांची तात्काळ बदली करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्यांच्या कामगिरी बदल्यामागील नेमके कारण काय, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रशासनाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण मिळणे अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे कामगिरी बदल्यांसाठी नेमके कोणते प्रशासकीय निकष वापरण्यात आले, तक्रारींची चौकशी कोणत्या पद्धतीने करण्यात आली आणि संबंधित शिक्षकांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेषतः काही बदल्यांचे अंतर मोठे असल्याने त्या शासनाच्या लागू नियमांनुसार आहेत का, याची तपासणी करण्याची मागणी शिक्षकांकडून होत आहे. तसेच आर्थिक व्यवहारांचे आरोप झाले असल्यास त्यांचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे. शिक्षण विभागाने संबंधित कामगिरी बदल्यांचे आदेश, तक्रारी, चौकशी अहवाल आणि त्यासाठी लागू करण्यात आलेले प्रशासकीय निकष स्पष्ट करून हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी शिक्षक वर्तुळातून होत आहे. आरोपांची सत्यता अधिकृत चौकशीतूनच स्पष्ट होणार असल्याने प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकूणच संगमेश्वर तालुक्यातील शिक्षकांच्या सध्या सुरु असलेल्या कामगिरी बदल्यांचा विषय चांगल्याच चर्चेला जात असुन गेली काही वर्ष प्रशासक असताना सारे सुरळीत असताना नुकतीचे शासनाचे प्रतिनिधी बसताच कामगिरी बदल्या या वादाग्रस्त ठरव्यात ही दुर्दैवी बाब असल्याचे बोलले जात आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.