पनवेल : रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउन, रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर आणि रोटरी क्लब ऑफ मानसरोवर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच साहस फाउंडेशनच्या सहकार्याने ‘श्रावण क्वीन २०२६ – महाराष्ट्रीयन पारंपरिक साज’ या स्पर्धेचे आयोजन पनवेल येथील चंदू काका सराफ येथे करण्यात आले. नगरसेविका आर्या प्रवीण जाधव, रेश्मा भोईर, माधवी म्हात्रे, संजीवनी मालवणकर, संयोगिता टेमघर, वृषाली पाटील, ज्योती पाटील, अल्का कोळी, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत माने, भाग्यरथ गोस्वामी, संजय रोकडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण ३९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा, साज आणि कलागुणांचे सादरीकरण यामुळे स्पर्धेला विशेष रंगत आली. श्रावण क्वीन २०२६चे विजेतेपद रियानका मालुसरे यांनी पटकावले. स्वप्ना म्हात्रे आणि पल्लवी पाटील उपविजेत्या ठरल्या. रोटरी सहाय्यक प्रांतपाल रेश्मा कुरूप यांनी सांगितले की, सौंदर्य स्पर्धांप्रमाणेच महिलांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. अशा उपक्रमांमधून महिलांना स्पर्धेचा अनुभव घेण्यासोबतच आपली प्रतिभा आणि कलागुण सादर करण्याची संधी मिळते.
विजेत्यांना चंदू काका ज्वेलर्सतर्फे सोन्याची नथ, क्राऊन, चांदीची फ्रेम आणि ट्रॉफी, तर रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाउनतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अन्य स्पर्धकांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अभिनेत्री स्वप्नाली केळजी या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा गोळे यांनी केले, तर कोरिओग्राफीची जबाबदारी साक्षी गायकवाड यांनी सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी चंदू काका सराफचे शाखा व्यवस्थापक अमेय जोशी, फ्लोअर मॅनेजर श्याम धनावडे, फ्लोअर इन्चार्ज जान्हवी इंदुलकर आणि संतोष सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.