खेड - सामाजिक आणि सांस्कृतिक रंग देण्यासाठी खेडमध्ये यंदा 'नमो दहीहंडी उत्सव 2026' चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी व राजवैभव प्रतिष्ठान, खेड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या दिमाखदार सोहळ्यात विजेत्या गोविंदा पथकासाठी तब्बल 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.
शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, खेड येथे हा उत्सव रंगणार आहे. त्यामुळे खेड शहरासह परिसरातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहीहंडी फोडण्यासाठी होणारी चुरस, मानवी मनोरे, जल्लोष आणि ढोल-ताशांचा निनाद यामुळे खेडच्या चौकात थरारक वातावरण अनुभवायला मिळणार आहे. विजेत्या पथकाला रोख पारितोषिकासोबत मानाची गदा, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय उत्सवात सहभागी होणाऱ्या पथकांसाठी सलामीच्या आकर्षक रोख पारितोषिकांचीही घोषणा करण्यात आली आहे. विविध सलामींसाठी 10 हजार, 8 हजार, 7 हजार आणि 5 हजार रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
उत्सवाची रंगत आणखी वाढविण्यासाठी मुंबईतील नामवंत नृत्यकलाकारांचे भव्य शरीरसौष्ठव प्रदर्शन हे विशेष आकर्षण ठरणार आहे. त्यामुळे दहीहंडीच्या थरारासोबत मनोरंजनाची मेजवानीही खेडवासीयांना मिळणार आहे. भव्य आयोजन, विक्रमी रोख बक्षीस आणि मनोरंजनाचा तडका यामुळे यंदाचा 'नमो दहीहंडी उत्सव 2026' खेडमधील लक्षवेधी सार्वजनिक कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होऊन गोविंदा पथकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन वैभव खेडेकर यांनी केले आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.