देवगड (प्रतिनिधी) - देवगड स्पोर्टस् क्लब आणि देवगड अँगलर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मिठमुंबरी बीचवर रविवारी आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पहिल्या‘ फिशिंग टुर्नामेंट २०२६’ मध्ये समुद्रातील मासेमारी कौशल्याचा थरार अनुभवायला मिळाला. कोकण, गोवा आणि कर्नाटकातील नामांकित ३० एंग्लर्स सहभागी झाले होते. देवगड स्पोर्टस् क्लबचा हा पहिलाच स्पोर्टिंग इव्हेंट असून, या उपक्रमातून देवगडच्या साहसी क्रीडा पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या स्पर्धेतील पहिली पकड ललित परब (शिरगाव) यांनी सकाळी ८.२६ वाजता केली. शेवटची पकड करण तोडणकर (मालवण) यांनी दुपारी १.५५ वाजता केली. तर स्पर्धेत सर्वाधिक चार पकडी अनंत सावंत (कसाल) यांनी केल्या. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक समीर लाड (तळेबाजार)यांनी ४.७४० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी पटकावले. द्वितीय क्रमांक मंदार रेगे(कणकवली)यांनी ३.३०० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी मिळवला, तर तृतीय क्रमांक नयन सुतार (कणकवली)यांनी २.३८० किलो वजनाच्या वाघळी माशासाठी मिळवला. या प्रथम तीन विजेताना रोख रक्कम अनुक्रमे १११११, ७७७७, ३३३३ तसेच किट देऊन गौरव करण्यात आला.
'से नो टू ड्रग्स' चा संदेश देताना या स्पर्धेची थीम ‘Say No to Drugs’ ठेवण्यात आली होती. तरुणांनी अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, तसेच आरोग्यदायी आणि सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, हा संदेश या स्पर्धेतून देण्यात आला. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड स्पोर्टस् क्लबच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, “देवगडमध्ये काहीतरी नवीन घडत आहे, हे पाहून माझ्यापेक्षा अधिक आनंद कोणालाच होणार नाही. लोकांनी देवगडमध्ये यावे, देवगडचे नाव घ्यावे आणि देवगडचे नाव मोठे व्हावे, अशी माझी पहिल्या दिवसापासून अपेक्षा आहे.” पर्यटनाच्या नकाशावर देवगडला आणायचे असेल तर पारंपरिक कार्यक्रमांच्या पलीकडे जाऊन साहसी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा आयोजित करणे गरजेचे आहे. देशात आणि जगात सुरू असलेल्या विविध ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा अभ्यास करून देवगडमध्येही अशा स्पर्धा आयोजित कराव्यात. यातून स्थानिक तरुण, मच्छीमार समाज आणि क्रीडाप्रेमींना मोठे व्यासपीठ मिळेल, असे राणे यांनी सांगितले. देवगड स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून तरुणांना क्रीडा क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच देवगडची आरोग्यदायी आणि क्रीडाप्रेमी तालुका अशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. पहिल्याच कार्यक्रमातून क्लबने भविष्यातील मोठ्या उपक्रमांची दिशा दाखवून दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यापुढे यापेक्षाही मोठ्या आणि नाविन्यपूर्ण साहसी क्रीडा स्पर्धा देवगडमध्ये आयोजित कराव्यात. देवगड स्पोर्टस् क्लबच्या पाठीशी आपण सर्वजण भक्कमपणे उभे आहोत. देवगडच्या तरुणांनी क्रीडा क्षेत्रात पुढे येऊन आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन राणे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बोडस, अर्बन बँक देवगडचे अध्यक्ष प्रकाश राणे, बाळा खडपे, दयानंद पाटील, वैभव करंगुटकर, योगेश चांदोसकर, कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ तेली, कुणकेश्वरचे सरपंच महेश ताम्हणकर, मिठमुंबरीचे सरपंच बाळकृष्ण गावकर, योगेश चांदोस्कर, देवगड स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष ललित चांदोरकर, निवृत्ती तारी, तन्वी चांदोस्कर, मिठमुंबरी सरपंच बाळकृष्ण गावकर, किरण पाटील, सोहम पारकर आणि चिन्मय खानविलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले. स्पर्धेतील पकडलेले मासे ‘कॅच अँड रिलीज’ पद्धतीने पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. समुद्री जीवसृष्टीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे भान राखत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.