loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी स्कूलची अवनी मराठे संस्कृत कथाकथन स्पर्धेत प्रथम

खेड (प्रतिनिधी) - संस्कृतभारती, उत्तर रत्नागिरी संस्थेच्या सहयोगाने डी.बी.जे. महाविद्यालय, चिपळूण येथे संस्कृत भाषा दिनानिमित्त संस्कृत कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रोटरी स्कूलची अवनी मराठे हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव गौरवित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर स्पर्धेत एकूण ८ शाळांमधील प्रत्येकी ५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल, खेडच्या इयत्ता आठवीतील आर्या दरेकर, चैत्राली क्षीरसागर, खुशी रोडे, सार्थक मोरे आणि अवनी मराठे या विद्यार्थ्यांनी प्रथमच सहभाग नोंदवून उत्कृष्ट सादरीकरण केले. या स्पर्धेत इयत्ता आठवी ‘आर्यभट्ट’ची विद्यार्थिनी अवनी आशुतोष मराठे हिने प्रथम क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

टाईम्स स्पेशल

अवनी हिला रोटरी स्कूलचे संस्कृत शिक्षक ओंकार तांबे यांचे मार्गदर्शन लाभले होते. संस्थेचे चेअरमन डॉ‌. उपेंद्र तलाठी, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अवनीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg