loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण-चोरवणे आणि कासई-चिपळूण मार्गावरील बसेसचा आंबडस परिसरात अपघात ,दोन गाड्या समोरासमोर आदळल्या

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील आंबडस परिसरातील खांदाट गवळवाडी येथील चिरणी फाट्याजवळ दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक होऊन २१ जण जखमी झाले. जखमींमध्ये १८ प्रवाशांसह दोन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.चिपळूणहून चोरवणेच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि कासईहून चिपळूणकडे येणारी एसटी बस आंबडस परिसरातील खांदाट गवळवाडी येथील वळणावर समोरासमोर धडकल्या. धडक जोरदार असल्याने दोन्ही बसमधील अनेक प्रवाशांना दुखापत झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तीव्र उतार आणि धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. अपघातानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना घटनास्थळावरून बाहेर काढून उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनास्थळी बचावकार्य पूर्ण करण्यात आले असून, अपघातामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

टाइम्स स्पेशल

एसटी महामंडळाच्या आगार प्रमुख रणजित राजेशिर्के यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, या अपघातात १८ प्रवासी जखमी झाले असून, दोन चालक आणि एका वाहकासह एकूण २१ जण जखमी झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg