loader
Breaking News
Breaking News
Foto

रुद्र मोरजकरची घवघवीत कामगिरी; महाराष्ट्र संघात निवड

बांदा (प्रतिनिधी) - अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आयोजित १७ वर्षांखालील मुलांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने दमदार कामगिरी करत बाजी मारली. या विजयी संघात व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल, बांदा येथील विद्यार्थी रुद्र नारायण मोरजकर याची निवड झाली होती. रुद्रने संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपल्या खेळाची छाप पाडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेदरम्यान त्याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तब्बल तीन सामनावीर पुरस्कार पटकावले. तसेच संपूर्ण स्पर्धेतील सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरीची दखल घेत त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र संघातही त्याची निवड झाली आहे.

टाईम्स स्पेशल

रुद्रच्या या घवघवीत यशाबद्दल चेअरमन मंगेश कामत, गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व सदस्य, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सुनील दिवाकर नाटेकर, मुख्याध्यापिका मनाली देसाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रशांत देसाई यांचेही अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg