loader
Breaking News
Breaking News
Foto

रक्षाबंधनाला सामाजिक कर्तव्याची जोड; नवनिर्माणच्या विद्यार्थिनींनी पोलिस व एसटी कर्मचाऱ्यांना बांधली राखी

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा उत्सव नसून समाजाच्या रक्षणकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे, याचा वस्तूपाठ संगमेश्वर येथील नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी घालून दिला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पोलिस आणि बस कर्मचाऱ्यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात जाऊन कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस बांधवांना, तसेच संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांची अहोरात्र सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना राखी बांधली. या उपक्रमामुळे पोलिस व बस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थिनींनी राखीच्या धाग्यांतून सेवेतील या महत्त्वाच्या घटकांशी आपुलकीचे नाते जोडले. याप्रसंगी संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मितेश केणी, उपनिरीक्षक रेवणे, पाटील, भंडारे, लोखंडे आणि किशोर जोशी यांच्यासह इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते. राखी स्वीकारल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पोलिस निरीक्षक मितेश केणी यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल युगातील सोशल मीडियाच्या वापराबाबत अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.

टाईम्स स्पेशल

आजच्या काळात वाढणारे सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने कसा वापर करावा, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता आणि कर्तव्याची जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद ठरला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रशांत जाधव आणि प्रा. वर्षा झेपले यांनी मार्गदर्शन केले, तर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजना चव्हाण यांचे विशेष योगदान लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg