loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग बस स्थानकातील हायमास्टची दुरुस्ती करा, भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निवेदन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग बस स्थानकावर काही विद्युत उपकरणे बंद आहेत. सुलभ शौचालयामध्ये राञी अंधार असतो, शिवाय हायमास्ट देखील बंद आहे. अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी गैर घटना घडतात. याची दखल दोडामार्ग भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घेऊन दोडामार्ग बस स्थानकातील लाईट, हायमास्ट सुरू करा, असे निवेदन दोडामार्ग बस स्थानक कंट्रोल धारकांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोडामार्ग बसस्थानक आवारातील हायमास्ट (लाईट) गेल्या कित्येक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे. सदर बसस्थानकात लाईट बंद असल्याने उशीरापर्यंत स्थानकावर थांबणार्‍या प्रवाश्यांचे हाल होत असतात. तसेच रात्रीच्या वेळी लाईट नसल्याने महिलांसोबत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील महिन्यापासून गणेशोत्सव असल्याने बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असणार आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बस स्थानकाच्या आवारात लाईट असणे अत्यंत गरजेचे आहे, असे म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg