loader
Breaking News
Breaking News
Foto

पुढील वर्षी लांजा येथे होणारी मॅरेथॉन स्पर्धा भव्यदिव्य स्वरुपाची असेलः पालकमंत्री उदय सामंत

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - यावर्षी मॅरेथॉन स्पर्धेला स्पर्धकांचा प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षी लांजा येथे होणारी स्पर्धा ही भव्य दिव्य स्वरुपाची म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठी स्पर्धा ठरेल, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी लांजा येथे केले. श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी पाली संचलित डी.जे.सामंत इंग्लिश मिडीयम स्कूल लांजा यांच्यावतीने लांजा तालुका मर्यादित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धा लांजा येथे रविवारी दि. ३० ऑगस्ट रोजी पार पडली. यावेळी विद्यार्थ्याशी संवाद साधताना सामंत बोलत होते, यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, पुढच्या वर्षी मॅरेथॉन स्पर्धेला जे कीट स्पर्धेच्या दृष्टीने आवश्यक असेल ते देखील उपलब्ध करून देण्याच नियोजन करण्यात येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषत: आम्ही ड्रग्ज मुक्त रत्नागिरी जिल्हा अशी मोहीम सुरु केली आहे. सध्या लहान मुले देखील ड्रगच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे माझी उपस्थित पालकांना कळकळीची विनंती आहे की, या मोहिमेत सर्वानी सहभागी व्हावे कारण आपल्या सगळ्या पुढे मोठे संकट ड्रग सेवनचे आहे. मुलामध्ये होणा-या ड्रग्जच्या सेवनावर प्रतिबंध करण्यासाठी राजकारण न करता एकत्र आले पाहिजे. राजकारण होत राहिल पंरतु पिढीला सांभाळायचे असेल आणि पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन करायचे असेल तर अशा स्पर्धांमधून जनजागृतीचे विषय जिल्ह्यात तथा महाराष्ट्रात झाले पाहिजेत.

टाईम्स स्पेशल

तसेच छोटे खेळाडू हे उद्याचे भविष्य आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबर शरीराने आणि मनाने तंदुरुस्त असणे आजच्या पिढीसाठी अत्यंत गरजेचे आहे. खेळामुळे मुलांमध्ये शिस्त, जिद्द, संघभावना आणि पराभवाने न खचतात पुन्हा उभे रहाण्याची जिद्द निर्माण होते. कोण जिंकला कोण हरला याला महत्व नाही, स्पर्धेत हिरीरीने सहभाग घेणे हेच त्याचे सर्वात मोठे यश असते, असेही पालकमंत्री उदय सामंत शेवटी म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg