loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नमाला माईन यांचे अल्पशा आजाराने निधन

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : देवरूख येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालयात अपंग समावेशित शिक्षण प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या रत्नमाला माईन ऊर्फ सानिका भितले यांचे अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. त्यांच्या निधनाने देवरूख शिक्षण विभागासह सहकारी वर्गावर शोककळा पसरली आहे. रत्नमाला माईन या अत्यंत हसतमुख, कर्तव्यदक्ष आणि मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. सहकारी तसेच परिचितांच्या सुख-दुःखात त्या नेहमीच धावून जात असत. संघर्षातून शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी देवरूख केंद्रात अपंग समावेशित शिक्षणाच्या शासन प्रतिनिधी म्हणून अत्यंत निष्ठेने व जिद्दीने काम केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांच्या नियोजन व व्यवस्थापनातही त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा. त्यामुळे देवरूख शिक्षण विभागात त्या परिचित होत्या. काही महिन्यांपूर्वी प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांची शासकीय सेवा कायम झाली होती. जनगणनेच्या कामकाजादरम्यान शारीरिक त्रास होत असतानाही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले होते. अवघ्या ३६व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने सहकाऱ्यांना या दुर्दैवी घटनेवर विश्वास ठेवणेही कठीण झाले आहे. त्यांच्या पश्चात भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले पती आणि अवघे साडेतीन वर्षांचे लहान बाळ असा परिवार आहे. लग्नानंतर अनेक वर्षांनी त्यांना अपत्यप्राप्ती झाली होती. त्यामुळे त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

टाईम्स स्पेशल

देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचे अशा प्रकारे अकाली निधन झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने एक कर्तव्यनिष्ठ कर्मचारी, सहकाऱ्यांची जिवाभावाची मैत्रीण आणि कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. देवरूख येथील सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह शिक्षण विभागातील सहकाऱ्यांनी सौ, रत्नमाला माईन यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg