loader
Breaking News
Breaking News
Foto

म्हसळ्यात रंगणार ‘कुणबी श्रावण महोत्सव २०२६’; समाजातील लोकप्रतिनिधींचा होणार सन्मान

म्हसळा : म्हसळा तालुका कुणबी समाज पश्चिम विभागाच्या युवक मंडळ व महिला मंडळाच्या वतीने ‘कुणबी श्रावण महोत्सव स्नेह मेळावा २०२६’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असून, ‘संस्कृती परंपरा एकता स्नेह’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात येणार्‍या या महोत्सवात तालुक्यातील सर्व कुणबी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून कुणबी समाजातील सांस्कृतिक परंपरा, सामाजिक एकोपा आणि स्नेह वृद्धिंगत करण्याबरोबरच समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणार्‍या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. म्हसळा तालुक्यात कुणबी समाजातून कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येऊन समाजाची ताकद वाढविणार्‍या म्हसळा पंचायत समितीचे सभापती बबन मनवे, म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष सुनील शेडगे, पंचायत समिती सदस्या समृद्धी चाचले आणि पंचायत समिती सदस्या प्रियंका निंबरे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महिला अध्यक्षा मिनाताई टिंगरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून, पश्चिम विभाग कुणबी समाज ग्रामीणचे अध्यक्ष धोंडू चव्हाण व पश्चिम विभाग कुणबी समाज ग्रामीणच्या अध्यक्षा मंदिनी धाडवे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला कुणबी समाज तालुका अध्यक्ष महादेव भिकू पाटील, कुणबी समाज मुंबईचे अध्यक्ष महेंद्र टिंगरे, पंचायत समिती सभापती बबन मनवे, नगराध्यक्ष सुनील शेडगे, पंचायत समिती सदस्या समृद्धी चाचले, प्रियंका निंबरे, कुणबी समाज तालुका सचिव राजाराम तिलटकर, कुणबी समाज मुंबईचे सचिव राजू धाडवे, तालुका उपाध्यक्ष दिलीप मांडवकर, उत्तर मध्य विभाग अध्यक्ष लहू तुरे, दक्षिण विभाग अध्यक्ष मोहन शिंदे, पूर्व विभाग अध्यक्ष अंकुश खडस, सामाजिक कार्यकर्ते प्रसाद बोर्ले, तसेच मुंबई पश्चिम (तळवडे) विभागाचे अध्यक्ष राकेश पेंढारी, सचिव सतीश पाटील, महिला अध्यक्षा करुणाताई काप आणि सचिव तनिषा डिंगणकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

टाईम्स स्पेशल

महोत्सवात महिलांसाठी आणि समाजबांधवांसाठी पारंपरिक फुगडी, झिम्मा, पारंपरिक नृत्य तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने समाजबांधवांना एकत्र आणत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, २ सप्टेंबर २०२६ रोजी, एच. डी. शिंदे सभागृह, कुणबी समाज, म्हसळा येथे सकाळी ठीक १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पश्चिम विभागाचे सचिव महेश पवार, खजिनदार राजेंद्र भोगळ, सचिव रागिनी भोगळ, खजिनदार स्नेहल पिचुर्ले, युवक मंडळ अध्यक्ष किरण मोरे, सचिव ज्ञानेश्वर कोबनांक, खजिनदार नितेष म्हसकर यांच्यासह विभागीय पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत. ‘कुणबी श्रावण महोत्सव २०२६’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा आणि सामाजिक एकतेला बळ देणारा स्नेहमेळावा ठरावा, यासाठी सर्व कुणबी बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg