loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुलींच्या लंगडी स्पर्धा उत्साहात

दोडामार्ग : शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे राष्ट्रीय क्रीडा दिन २०२६ निमित्त मुलींसाठी विशेष लंगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बँक ऑफ इंडिया, शाखा दोडामार्ग यांच्या पुरस्कर्तेपदातून तसेच शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थिनींमध्ये क्रीडाभावना, संघभावना, आत्मविश्वास आणि शारीरिक तंदुरुस्ती वाढावी, तसेच पारंपरिक मैदानी खेळांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये इयत्तानिहाय गटांमध्ये सामने संपन्न झाले असून इयत्ता ६ वी, ८ वी, १० वी आणि ११ वी विज्ञान वर्गातील मुलींचे संघ विजयी झाले.

टाईम्स स्पेशल

यशस्वी संघांना बँक ऑफ इंडिया शाखा दोडामार्गचे शाखाधिकारी विनोद कुलकर्णी, मुख्याध्यापक संजय पाटील, सोनावला हायस्कूलची क्रीडा शिक्षक अजय सावंत, पिकुळे हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक आंबुलकर, सहायक शिक्षक अनिल मांगले, आनंदा बामणीकर, बँक ऑफ इंडिया चे कर्मचारी शुभम गावडे व इफ्तिकार पटेल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. “खेळूया, शिकूया, तंदुरुस्त राहूया आणि प्रगती करूया!” या संदेशातून विद्यार्थिनींना खेळाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचा दृष्टिकोन घ्यावा असा शुभेच्छा संदेश संस्था अध्यक्ष विक्रांत विकास भाई सावंत यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg