मंडणगड (प्रतिनिधी) : मंडणगड तालुक्यातील देव्हारे–वडवली–आतले रस्त्यावर पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने तातडीने ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपा अनुसूचित जाती मोर्चा, उत्तर रत्नागिरीचे जिल्हा सरचिटणीस अभिजीत देवळेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी वनपाल, वनविभाग मंडणगड यांच्याकडे २७ ऑगस्ट रोजी निवेदन सादर केले आहे. या परिसरात यापूर्वीही बिबट्याचा वावर निदर्शनास आला होता. आता पुन्हा बिबट्याच्या हालचाली आढळून येत असल्याने नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
देव्हारे–वडवली–आतले हा नागरिकांच्या दैनंदिन ये-जा करण्याचा महत्त्वाचा मार्ग असून, सकाळी व सायंकाळच्या वेळेत शेतकरी, विद्यार्थी, महिला, दुचाकीस्वार तसेच इतर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अशा वर्दळीच्या मार्गावर बिबट्याचा वावर राहणे ही चिंतेची बाब असल्याचे देवळेकर यांनी म्हटले आहे. वनविभागाने केवळ पाहणी करून थांबता कामा नये, तर बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनकर्मचाऱ्यांची नियमित गस्त वाढवावी, संभाव्य ठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवावेत आणि आवश्यकतेनुसार नियमानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच परिसरातील नागरिकांना बिबट्याच्या वावराबाबत सतर्कतेच्या सूचना देऊन जनजागृती करावी, विशेषतः सकाळी व सायंकाळच्या वेळी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याबाबत गावपातळीवर मार्गदर्शन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाऊ नये, त्याला चिथावू नये किंवा त्याचा पाठलाग करू नये, याबाबत नागरिकांना स्पष्ट सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यामुळे देव्हारे–वडवली–आतले परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन वनविभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी अभिजीत देवळेकर यांनी केली आहे.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.