loader
Breaking News
Breaking News
Foto

ऐन सणासुदीच्या काळात गगनाला भिडलेल्या महागाईविरोधात शिवसेना ठाकरे पक्षातर्फे २ सप्टेंबरपासून भव्य जनआंदोलनास सुरुवात- तालुकाप्रमुख नंदु शिंदे

वैभववाडी (प्रतिनिधी) - महावितरण कंपनीकडून सर्वसामान्य जनतेवर जबरदस्तीने लादण्यात येणारे वादग्रस्त ‘स्मार्ट मीटर्स’ आणि ऐन सणासुदीच्या काळात गगनाला भिडलेली महागाई याविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या जनविरोधी धोरणांच्या विरोधात बुधवार, दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता शिवसेना शाखा, वैभववाडी येथून भव्य जनआंदोलनास सुरुवात करण्यात येणार आहे, अशी अधिकृत घोषणा आज आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांनी केली. येथील शिवसेना शाखा, वैभववाडी आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका मांडताना तालुकाप्रमुख नंदू शिंदे यांनी शासन आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिंदे पुढे बोलताना म्हणाले, सध्या सणासुदीचे दिवस सुरू असताना साखर, कांदा, विविध डाळी, खाद्यतेल आणि घरगुती गॅस सिलिंडर यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ दरवाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहक, गृहिणी आणि कष्टकरी वर्गाला नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून त्यांचे मासिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. ग्राहकांकडे सध्या असलेले डिजिटल मीटर्स पूर्णपणे अचूक आणि सुस्थितीत असताना ते काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट केवळ ठरावीक बड्या भांडवलदारांचे आणि कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठीच घातला जात आहे. ज्या भागात हे स्मार्ट मीटर लावले आहेत, तिथे वीज वापराचे प्रमाण तेच असताना बिले दुप्पट ते तिप्पट येत असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ही शुद्ध आर्थिक लूट आहे. ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या व अचानक अंधार कोकणातील व वैभववाडीतील दुर्गम ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कची प्रचंड समस्या आहे. स्मार्ट मीटर सर्व्हरशी कनेक्ट नसल्यास बिघाड वाढतील. तसेच बिल भरण्यास १-२ दिवसांचा उशीर झाला तरी सिस्टीम आपोआप वीज कट करेल.

टाईम्स स्पेशल

नेटवर्क अभावी वीज पूर्ववत होण्यासाठी कित्येक दिवस अंधारात राहावे लागेल, ज्याचा फटका विद्यार्थी, रुग्ण व वृद्धांना बसेल. घराच्या मालकाची कोणतीही लेखी परवानगी न घेता महावितरणकडून पोलीस बळाचा किंवा कर्मचार्‍यांचा धाक दाखवून मीटर बदलले जात आहेत, ही दडपशाही शिवसेना खपवून घेणार नाही. सणासुदीच्या काळात जनतेच्या खिशावर मारलेला दरोडा आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली चाललेली ही लूट शिवसेना मुकाट्याने सहन करणार नाही. सर्वसामान्यांवर होणार्‍या या अन्यायाविरुद्ध जनतेचा बुलंद आवाज बनून शिवसेना आता रस्त्यावर उतरत आहे. महावितरणने ही सक्ती तात्काळ रद्द करावी, अन्यथा बुधवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना शाखेजवळून युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू होणार्‍या या तीव्र जनआंदोलनात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी, गृहिणी आणि ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाप्रमुख श्री. नंदू शिंदे यांनी केले आहे. तसेच या आंदोलनानंतर उद्भवणार्‍या सर्व परिस्थितीला शासन आणि महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा सज्जड दमही त्यांनी दिला. याावेळी काझी, माझी जी प सदस्य दिव्या पाचपुडे स्वप्निल रावराणे रोहित पावसकर आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg