संगलट (इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागामधील महावितरण कार्यालय कर्जीच्या कर्मचार्यांची पावसाळ्यामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने तारेवरची कसरत नेहमीच होत असते आणि ही त्यांची मेहनत पाहून आमशेत येथील ग्रामस्थ मदतीच्या दृष्टीने नेहमीच सहकार्य करत असतात. अचानक आमशेत येथील २०० केव्हीए चा रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने आमशेत येथील विद्युत पुरवठा रात्री नऊ नंतर बंद झाला सदर विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्यासाठी कोणतीच एजन्सी उपलब्ध झाली नसल्याने तेथील विद्युत पुरवठा चालू करणे बाबत मोठा प्रश्न महावितरणसमोर निर्माण झाला.
परंतु ही अडचण येथील ग्रामस्थांनी लक्षात घेऊन त्यांनी महावितरण कर्मचार्यांना मोठे सहकार्य केले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे तेथील विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्यात महावितरण कर्मचार्यांना मोठे यश आले. या सहकार्याबद्दल महावितरण अधिकारी व कर्मचार्यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. आमशेत येथील मोजमभाई अब्दुल गणी परकार व ग्रामस्थांनी महावितरण कंपनीतील कर्मचार्यांची अडचण लक्षात घेऊन आमशेत येथील बिघाड झालेला रोहित्र बदलण्यासाठी गाडी तसेच क्रेन देखिल उपलब्ध करून दिली.
या केलेल्या विशेष सहकार्याबद्दल महावितरण अधिकारी व कर्मचार्यांनी मोजमभाई व ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले. सदर ठिकाणी विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्यासाठी आमशेत येथील ग्रामस्थ, उपकार्यकारी अभियंता वेलमकर, कनिष्ठ अभियंता बडगुजर व महावितरण शाखा कार्यालय कर्जी येथील सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.