रत्नागिरी : (जमीर खलफे) - नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून रत्नागिरीतील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य मांडवी समुद्रकिनार्यावर गुरूवारी संध्याकाळी भक्तिमय आणि उत्साही वातावरणात सागरपूजन पार पडले. परंपरेनुसार आणि मोठ्या दिमाखात पोलीस बँडच्या धून आणि मंगलमय गजराच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते दर्यादेवाला विधीवत नारळ अर्पण करण्यात आला. या वेळी शहरातील विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सकाळपासूनच मांडवी किनार्यावर सणाचा एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. संध्याकाळी पोलीस ताफ्यासह पोलीस बँड पथकाचे किनार्यावर आगमन झाले. बँडच्या वाद्यवृंदाने मांडवी किनार्यावरील वातावरण पूर्णपणे भक्तिमय आणि मंगलमय करून टाकले होते. त्यानंतर डीएसपी नितीन बगाटे यांनी इतर वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या समवेत समुद्राच्या लाटांजवळ जाऊन विधीवत पूजा-अर्चा केली. हातात नारळ घेऊन डीएसपी नितीन बगाटे आणि उपस्थित पोलीस अधिकार्यांनी भ अत्यंत श्रद्धेने दर्यादेवाला प्रार्थना केली. रत्नागिरीतील सर्व नागरिक, विशेषतः सागरी सीमेचे आणि समुद्रावर उपजीविका भागवणार्या कोळी बांधवांचे रक्षण व्हावे, नैसर्गिक आपत्तींपासून सर्वांचा बचाव व्हावा आणि जिल्ह्यात सुख-शांती कायम राहावी, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली. प्रार्थनेनंतर जयघोषाच्या आणि टाळ्यांच्या गजरात डीएसपी नितीन बगाटे यांनी सागराला नारळ अर्पण केला. या पूजनानंतर उपस्थितांमध्ये आणि कोळी बांधवांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. हा संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.