संगमेश्वर : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून लोवले येथील नवनिर्माण महाविद्यालयात लगोरी, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पारंपरिक खेळ असलेल्या लगोरीला विशेष प्राधान्य देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. लगोरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पारंपरिक खेळाची ओळख करून देण्याबरोबरच त्याचे नियम आणि खेळण्याची पद्धत याबाबत माहिती देण्यात आली. विशेषतः नवयुवतींनी या खेळात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
नवनिर्माण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण आणि नवनिर्माण नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम यांनी स्वतः मैदानात उतरून खेळामध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्राचार्यांनी स्वतः खेळात सहभागी होत विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केल्याने क्रीडा वातावरण अधिक आनंददायी झाले. लगोरी स्पर्धेचे उद्घाटन डॉ. प्रज्ञा कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संजना चव्हाण, डॉ. संतोष खरे, प्राध्यापक मितेश पवार, प्रा. प्रशांत जाधव, प्राध्यापक निकिता कदम, प्राध्यापक झिबा अलजी, प्राध्यापक राजवाडे, प्राध्यापक सिमरन वाडकर यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, संघभावना, नेतृत्वगुण आणि पारंपरिक खेळांविषयी आवड निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत क्रीडा दिन उत्साहात साजरा केला. या स्पर्धा महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या.





























































































_(1).jpg)



















_(1).jpg)
































































.jpg)
.jpg)





.jpg)
































































































































































































































































































.jpg)
































































1.jpg)

























































































































































































































































































































































2.jpg)






















































































































































































1.jpg)



























































1.jpg)













































.jpg)

























































































































































































































































.jpg)


















































































































































































































































.jpg)
_(1).jpg)





























































.jpg)


_(1).jpg)




































































































































































































































































































































































































































































































1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)



































































































































































































































































































































































































.jpg)

































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.